मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या रागीट आणि बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, नुकतंच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात त्या फोटोग्राफर्सवर भडकल्याचे दिसत आहेत.
अमिताभ आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचा काल वाढदिवस होता. या पार्टीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी जया बच्चनही पांढऱ्या रंगाचा सलवार सूट परिधान करत पार्टीत दाखल झाल्या होत्या. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी याने या वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक फोटो पोस्ट केले आहे. यातील काही व्हिडीओमध्ये जया बच्चन या श्वेताच्या पार्टीत सहभागी होताना दिसत आहेत. ही पार्टी संपल्यानंतर जया बच्चन या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी बाहेर उपस्थित असलेल्या अनेक पापाराझींनी जया बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत जया बच्चन या त्यांच्या गाडीत बसल्याचे दिसत आहे. यावेळी फोटोग्राफर काढत असलेले फोटो पाहून जया बच्चन त्यांच्यावर चांगल्याच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी हातानेच इशारे करत काय आहे, असे विचारले. जया बच्चन यांची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन अनेक यूजर्सनी त्यांना ट्रोलही केले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.