मुंबई : मराठीतील असे अनेक चित्रपट आहेत जे प्रेक्षकांच्या मनावर अजूनही राज्य करतात. मराठी चित्रपटसृष्टीने असे अनेक चित्रपट दिले आहेत जे विसरणे कठीण आहे. यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘जत्रा’. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची दिशा बदलून टाकली होती. ‘जत्रा’ चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं होतं. या चित्रपटातले असे अनेक डायलॉग आहेत जे आजची प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत.
दरम्यान, ‘जत्रा’ या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, ‘जत्रा 2’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोबतच कुशल बद्रिकेनेसुद्धा आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली आहे.
कुशल बद्रिकेने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली त्याला १६ वर्षाहून जास्त काळ लोटलाय.. कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे! म्हणूनच ह्या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय..ह्या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला ‘जत्रा 2’ येतोय!”