मुंबई : दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांनी 4 वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. आज (24 फेब्रुवारी) त्यांची चौथी पुण्यतिथी आहे. यावेळी श्रीदेवी यांचे कुटुंब भावुक झालेले दिसत आहे. त्यातच त्यांची मुलगी जान्हवी कपूरने काही जुने फोटो पोस्ट करत आपली आई श्रीदेवी यांची आठवण काढली आहे.

जान्हवीने आईसोबतचा तिचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने खूपच हृदय स्पर्शी नोट यावेळी लिहिली आहे. तिने लिहिले की, ‘मी माझ्या आयुष्यातील जास्त वर्षे तुझ्याशिवाय घालवली आहेत. पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात आणखी एक वर्ष जोडले गेले याचा मला तिरस्कार आहे. मला आशा आहे की आई तुला माझा अभिमान वाटत असेल. कारण हीच गोष्ट मला पुढे नेणारी आहे. तुझ्यावर सदैव प्रेम’, अशी भावुक नोट जान्हवीने या फोटोसोबत लिहिली आहे. जान्हवीच्या या इमोशनल पोस्टवर अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, वयाच्या ५४ व्या वर्षी दुबईत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवी यांच्या जाण्याने सर्वांना खूप मोठा धक्का बसला होता. या मृत्यूनंतर श्रीदेवीच्या दोन्ही मुली अंशुला आणि जान्हवी तुटून गेल्या होत्या. आता त्या हळूहळू आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आपल्या आईचा वारसा पुढे नेत आहेत.