हैद्राबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांची आज १७ मार्च रोजी पहिली जयंती आहे. लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या या सुपरस्टारने 2021 साली अचानक या जगाचा निरोप घेतला. या बातमीने सिनेमा जगातील आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आज वाढदिवसानिमित्त त्यांचा ‘जेम्स’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

पुनीत राजकुमारचा शेवटचा चित्रपट ‘जेम्स’ आज त्याच्या पहिल्या जयंतीनिमित्त प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र जारी केले होते. ‘जेम्स’ या चित्रपटात त्याच्यासोबत काम केलेला सरथकुमार पुनीत राजकुमारची आठवण करून भावूक झाला आणि त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पुनीतची आठवण करून सरथकुमारने ट्विटर हँडलवर ट्विटरवर स्वतःचे आणि पुनीतचे फोटो शेअर करत लिहिले, “उद्या अप्पुचा वाढदिवस आणि जेम्सचे रिलीज आहे. माझ्याकडे शब्द नाहीत आणि माझा मेंदू काम करत नाही. मी गोंधळलो आहे की मी जेम्सच्या रिलीजवर आनंदी आहे की दुःखी’ कारण. तो स्वर्गात आहे.”

तसेच, सरथकुमार पुढे लिहितात, “अप्पू मला तुझी आठवण येते आणि तुझ्या नावाचा उल्लेख केल्याने माझ्या डोळ्यात पाणी येते. मी शब्दांसाठी गुदमरतो. दुःख आणि नैराश्याने मला घेरले आहे. मी भूतकाळात अनेकांवर प्रेम केले आहे. अधिक जवळचे गमावले आहेत. पण माझ्या भावना अवर्णनीय आहे.”

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन चेतन कुमार यांनी केलं आहे. यामध्ये प्रिया आनंद, मेका श्रीकांत, अनु प्रभाकर मुखर्जी आणि इतर कलाकार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून यामध्ये पुनीत यांचे मोठे भाऊ राघवेंद्र राजकुमार आणि शिवराजकुमार दिसणार आहेत. दिवंगत अभिनेते पुनीत यांच्यासाठी 17 ते 23 मार्च या आठवड्यात कोणताही दुसरा चित्रपट प्रदर्शित न करण्याचं कर्नाटक चित्रपट वितरकांनी ठरवलं आहे.