मुंबई : माजी भारतीय फलंदाज आणि समालोचक मोहम्मद कैफने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा नवा कर्णधार रवींद्र जडेजावर मोठे भाष्य केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जडेजा नेहमी प्रमाणे खेळताना दिसला नाही यावेळी वेळी तो दडपणाखाली खेळताना दिसला असल्याचे कैफने म्हंटले आहे.
स्पोर्ट्स टॉक शोमध्ये बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “जडेजा हा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे जो भारतासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली. जडेजा थोडा घाबरलेला दिसत होता. कदाचित त्याच्यावर कर्णधारपदाचे थोडे दडपण असेल. त्याला मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही. तो गोलंदाजीलाही उशीरा आला. कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना असल्यामुळे कदाचित असे झाले असावे असे देखील कैफने स्पष्ट केले आहे.
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, ‘दीपक चहर ऐवजी तुषार देशपांडेला ओव्हर देऊन जडेजाने चूक केली. तसेच त्यांच्या मुख्य खेळाडूंनी धावा केल्या नाहीत उथप्पा चांगला दिसत होता पण तोही यष्टीचीत झाला. तो १३१ धावांवर बाद झाला.
कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 6 विकेटने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना, CSK ने निर्धारित 20 षटकात फक्त 131 धावा केल्या होत्या, जे KKR ने 18.3 मध्ये गाठले. केकेआरसाठी उमेश यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 4 षटकात 20 धावा देत 2 बळी घेतले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.