मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ही जोडी प्रेक्षकांना फारच आवडते. हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या दोघांनी लवकर लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची देखील इच्छा आहे. दरम्यान काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या चर्चांवर आता अर्जुन कपूरने पुढे येत मौन सोडले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरने मलायकासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. तो म्हणाले, ‘सोशल मीडियावर काय चालले आहे याकडे ते फारसे लक्ष देत नाहीत आजच्या काळात लोकांना गॉसिप करायला आवडते आणि लोक इतरांच्या आयुष्याबद्दल खूप लवकर मत देतात. अशा स्थितीत त्या लोकांच्या माता झाल्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.’ असे बोलत अर्जुन कपूरने ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले आहे.

दरम्यान, अभिनेत्री मलायका अरोराने पाहिले लग्न अभिनेता अरबाज खानसोबत 1998 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर काही वादांमुळे दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर अरबाज खानने प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीशी जवळीक वाढली, तर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली.