JADEJA
IPL 2022: "Win at least one match", CSK trolls after four consecutive defeats

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे पराभवाचे चक्र सुरूच आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या CSK संघाला 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह चेन्नईने चालू मोसमात सलग चार सामने गमावले आहेत. या सामन्यात हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने धडाकेबाज अर्धशतक ठोकून आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला.

या मोसमात सलग दोन सामने गमावल्यानंतर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने आपले विजयाचे खाते उघडले आहे. या मोसमात सलामीवीराची भूमिका बजावत अभिषेकने अवघ्या 50 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. या खेळीसह त्याने स्वतःला सिद्ध देखील केलं आहे.

जेव्हा चेन्नईचा विचार केला तर या संघासाठी सध्या काहीही योग्य होताना दिसत नाही. आयपीएलच्या 15 व्या मोसमात संघाची फलंदाजी किंवा गोलंदाजी दोन्ही फ्लॉप दिसत आहे. त्यामुळेच चाहत्यांना आपला राग आवरता आला नाही आणि सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर ते सीएसकेला प्रचंड ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर चाहते चेन्नईला मोठ्याप्रमाणात ट्रोल करत आहे.