मुंबई : माजी क्रिकेटर हरभजन सिंगने IPL 2022 च्या पहिल्या सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामना कोणता संघ जिंकू शकतो हे त्याने सांगितले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2021 चा विजेता आहे आणि अंतिम फेरीत त्यांनी KKR चा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. CSK आणि KKR यांच्यात आतापर्यंत 26 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज 17-8 ने आघाडीवर आहे आणि एक सामना रद्द झाला आहे.
हरभजन सिंगच्या मते, या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा वरचष्मा असू शकतो. हरभजनच्या मते केकेआर पहिला सामना जिंकेल कारण त्यांचा संघ तरुण आहे आणि संघात अनेक महान खेळाडू आहेत. त्यांच्याकडे चांगले हिटर आणि दोन उत्कृष्ट फिरकीपटूही आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्यात KKR संघ CSK चा पराभव करेल असे हरभजनने म्हंटले आहे.
यावेळेस केकेआरचा संघ नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली विजयाने सुरुवात करू इच्छितो, तर चेन्नई सुपर किंग्जलाही रवींद्र जडेजाचा नवा कर्णधार मिळाला आहे.