मुंबई : पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी स्पर्धेच्या आगामी हंगामात कोण त्याचा सोबत सलामी देणार याबाबत खुलासा केला आहे. रोहित शर्माने यावेळी इशान किशनसह डावाची ओपनिंग करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रोहितने यावेळी सूर्यकुमार यादव बाबतही माहिती दिली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे सूर्यकुमार सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे उपचार घेत आहे.
यावेळी रोहित रोहित म्हणाला, “मी बॅटिंगची सलामी देईन. मी हे याआधीही करत आलो आहे, यावेळी मी इशान किशनसोबत सलामी देणार आहे. सूर्या सध्या एनसीएमध्ये आहे. पण तो लवकरच बरा होऊन इथे येईल. त्याची उपलब्धता आत्ताच सांगता येणार नाही. पण NCA कडून मंजुरी मिळाल्यानंतर, आम्ही त्याला लवकरात लवकर इथे आणण्याचा प्रयत्न करत आहोत.”
तसेच रोहितने यावेळी मुंबईला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार या गोष्टीतला फेटाळून लावले आहे. मुंबईने मे 2019 मध्ये त्यांच्या शेवटचा सामना येथे खेळला होता, जिथे त्यांनी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आणि अखेरीस ट्रॉफी जिंकली.
यावर रोहित म्हणाला म्हणाला, “हा तुलनेने नवा संघ आहे, संघात बरेच नवीन खेळाडू आले आहेत. त्यामुळे आम्हाला फायदा मिळणार यावर विश्वास नाही कारण 70-80 टक्के संघ यापूर्वी मुंबईत खेळला नाही. फक्त मी, सुर्या, पोलार्ड, इशान आणि बुमराह यांनी मुंबईत जास्त सामने खेळले आहेत आणि इतरांनी खेळले नाहीत.”