WORNER
IPL 2022: Warner starts dancing to Allu Arjun's song in live match; Watch VIDEO

मुंबई : ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर हा बॉलिवूडचा खूप मोठा चाहता आहे हे सगळ्यांना ठाऊक असेलच. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट डेव्हिड वॉर्नरला फारच आवडला होता. आयपीएलपूर्वी या खेळाडूने या चित्रपचे बरच रील बनवून आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान आयपीएल चालू असताना देखील डेव्हिड वॉर्नर चढलेला पुष्पा फिवर पाहायला मिळाला. चालू मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नर सुपरस्टार अल्लू अर्जुनची नक्कल करताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अलीकडेच, झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2022 च्या सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नर अचानक ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यावर नाचताना दिसला. डेव्हिड वॉर्नरने हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. झाले असे होते की, चाहत्यांनी स्टँडवरून डेव्हिड वॉर्नरला डान्स स्टेप्स दाखवण्याची विनंती केली होती आणि वॉर्नरनेही त्यांना निराश केले नाही. हा व्हिडिओ शेअर करत डेव्हिड वॉर्नरने लिहिले की, ‘तुमचा काय विचार आहे?चाहत्यांकडून खूप विनंत्या आल्या.”

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर फॉर्ममध्ये दिसला. प्रथम त्याने पृथ्वी शॉसोबत पहिल्या विकेटसाठी 93 धावा जोडल्या. शॉने 29 चेंडूत 51 धावा केल्या.

View this post on Instagram

A post shared by David Warner (@davidwarner31)

यानंतर त्याने कर्णधार ऋषभ पंतसोबत ५५ धावांची भागीदारी केली. डेव्हिड वॉर्नरने बाद होण्यापूर्वी 45 चेंडूत 135.56 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्या. याआधी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने आयपीएल 2016 चे विजेतेपद पटकावले होते. तथापि, नंतर त्याला यपीएल कर्णधारपदावरून वगळण्यात आले आणि नंतर SRH सोबतच्या वादाच्या वातावरणामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.