sundar
IPL 2022: Sunrisers Hyderabad hit hard, Washington out for two beautiful matches!

मुंबई : आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघातील महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे पुढील दोन सामने मुकणार आहे. ऑफ-स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला हाताला दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो चालू असलेल्या आयपीएल 2022 मधील पुढील दोन सामन्यांना मुकणार आहे. 22 वर्षीय सुंदर हा आतापर्यंत या मोसमात एसआरएचसाठी एकमेव यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला आहे.

एका प्रसिद्ध वृत्तानुसार, संघ या खेळाडूवर पुढील दोन-तीन दिवस लक्ष ठेवणार आहे. वृत्तानुसार खेळाडूला बरे होण्यासाठी एक किंवा दोन आठवडे लागतील.

सुंदरला लेग-स्पिनर श्रेयस गोपाल आणि जे सुचित, हे दोन संभाव्य पर्याय आहेत. ज्यांच्याकडे सनरायझर्स संघ पाहू शकतो. त्यांच्याकडे अब्दुल समद देखील एक चांगला पर्याय आहे.

दरम्यान, राहुल त्रिपाठीची दुखापत गंभीर नसल्याने संघाला थोडासा दिलासा मिळाला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला टायटन्सविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना मध्यंतरी माघार घ्यावी लागली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला त्रिपाठी दुखापतीमुळे जमिनीवर कोसळला, त्याला सोमवारी वैद्यकीय उपचाराची गरज होती. त्याने 11 चेंडूत 17 धावा करून मैदान सोडले, मात्र तोपर्यंत सनरायझर्स सलग दुसऱ्या विजयाच्या मार्गावर होता. निकोलस पूरन आणि मार्कराम यांनी पाच चेंडू राखून हैदराबादला विजय मिळवून दिला. शुक्रवारी आणि रविवारी सनरायझर्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जशी होणार आहे.