SANRISE HAIDRABAD
IPL 2022: Sunrisers Hyderabad big hit, star player Kovid positive

पुणे : आयपीएल सीझन 15 सुरू झाला असून, त्यासाठी अनेक खेळाडू भारतात पोहोचले आहेत. या वर्षी आयपीएलमध्ये 12 न्यूझीलंड खेळाडूंनी भाग घेतला आहे, त्यापैकी 11 त्यांच्या संबंधित आयपीएल फ्रँचायझी सोबत आहेत, परंतु सनरायझर्सचा फलंदाज ग्लेन फिलिप्स अद्याप भारतात पोहोचलेला नाही. याचे कारण आता या फलंदाजानेच सांगितले आहे.

यावर्षी सनसायझर्स हैदराबादकडून खेळणारा ग्लेन फिलिप्स कोविड पॉझिटिव्ह आला आहे, ज्यामुळे तो अजूनही न्यूझीलंडमध्येच आहे. खुद्द ग्लेन फिलिप्सने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याचा खुलासा केला आहे.

ग्लेन फिलिप्सने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना स्टोरी शेअर करत याची माहिती दिली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे मी न्यूझीलंडमध्ये अडकलो आहे. मी शक्य तितक्या लवकर SRH मध्ये सामील होण्याचा प्रयत्न कारेन. आत्तापर्यंत सनरायझर्स फ्रँचायझीने ग्लेन फिलिप्सच्या उपलब्धतेबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही, त्यामुळेच या फलंदाजाला चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली आहेत.