LKANVU
IPL 2022: Something that happened with captain Rahul in a live match, the video is going viral

मुंबई : आयपीएलचा सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात लखनऊ संघाला विजयासाठी 211 धावांची गरज होती. याचा पाठलाग करताना लखनऊचा कर्णधार केएल राहुलसोबत लाईव्ह मॅचमध्ये असे काही घडले की सर्वत्र एकच हशा पिकला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या सामन्यात केएल राहुलने 26 चेंडूत 2 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 40 धावांची शानदार खेळी केली, मात्र यादरम्यान केएल राहुलचा बूट धाव घेताना मागे सुटला, त्यानंतर त्याचा सहकारी खेळाडू क्विंटन डी कॉकने कर्णधाराची मदत केली.

ही घटना लखनऊच्या डावाच्या पहिल्या षटकात घडली. यावेळी सीएसकेचा खेळाडू मुकेश चौधरी ओव्हर टाकत होता, या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर केएल राहुल हलक्या हाताने शॉट खेळून धाव घेत होता. दरम्यान, खेळपट्टीवर धावत असताना केएल राहुलचा बूट मागे राहिला. यानंतर क्विंटन डी कॉकने राहुलला मदत केली. याच मजेशीर घटनेचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 211 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. लखनऊ संघाने हा सामना 6 विकेटने जिंकला. क्विंटन डी कॉक आणि एविन लुईस यांनी संघासाठी शानदार अर्धशतके झळकावली.