मुंबई : मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीनंतर आणि सलग तीन पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने आपल्या सहकाऱ्यांना चेतावणी दिली आहे की, त्यांनी आगामी सामन्यांमध्ये जिंकण्याची भूक दाखवण्यास सांगितले आहे. शनिवारी, ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सामना RCB (MI vs RCB) विरुद्ध होणार आहे.
पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची हंगामाची सुरुवात खूपच खराब झाली, त्यांनी त्यांचे पहिले तीन सामने दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून हरले. केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या भाषणात रोहित म्हणाला, “आम्ही येथे कोणत्याही एका खेळाडूला दोष देऊ शकत नाही. यामध्ये आपण सर्व सहभागी आहोत. आपण सगळे मिळून जिंकतो आणि एकत्र हरतो.
तो पुढे म्हणाला, “मला वाटतं प्रत्येकाने जिंकण्यासाठी थोडी उत्सुकता दाखवली पाहिजे. जेव्हा आपण खेळतो, विशेषत: या स्पर्धेत, तेव्हा जिंकण्याची ही उत्सुकता खूप महत्त्वाची ठरते. प्रतिस्पर्धी संघ वेगवेगळे असल्यामुळे ते नेहमीच वेगवेगळ्या योजना घेऊन येतात. आपण नेहमी त्यांच्या पुढे टिकायकल हवे. आपण नेहमीच त्यांच्यावर वर्चस्व राखले पाहिजे.
रोहित म्हणाला, “आणि आम्ही हे फक्त एका मार्गाने करू शकतो आणि ते म्हणजे मैदानावर थोडी जिंकण्याची भूक दाखवावी लागेल. यावेळी रोहितने असेही सांगितले की आत्ता घाबरून चालण्याची वेळ नाही तर करून दाखवण्याची गरज आहे.”
“आम्ही काही चांगल्या गोष्टी करत आहोत. आम्ही खेळलेल्या तीनही सामन्यांमध्ये आम्ही काही खरोखरच चांगल्या गोष्टी केल्या आहेत. सामना सुरू असताना खेळाडूला त्या काही क्षणांत गोष्टी समजून घ्याव्या लागतात. सामन्यादरम्यान विचार करावा लागेल की हे ओव्हर आहे. या षटकात आपण काय करतो, या छोट्या गोष्टी आहेत. आम्हाला त्याचा प्रयत्न करावा लागेल आणि संघासाठी गोष्टी कराव्या लागतील. लय आपल्या संघाकडे असणे महत्वाचे आहे.”
पुढे कर्णधार म्हणाला, “आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही या खोलीत प्रतिभा, क्षमता आणि सर्व गोष्टींबद्दल बोलतो परंतु जोपर्यंत आम्ही मैदानावर जिंकण्याची भूक आणि उत्सुकता दाखवत नाही तोपर्यंत आम्ही प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध जिंकू शकत नाही. ही फक्त सुरुवात आहे त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. आम्हाला फक्त सर्व 11 खेळाडूंनी एकत्र मैदानात चांगली कामगिरी करायची आहे, बस.”