
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामाच्या दुसऱ्या वीकेंडला शनिवारी डबल हेडर पाहायला मिळणार आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. राजस्थान संघाने आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय मिळवला होता, तर मुंबईला पहिल्या सामन्यात दिल्ली संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. 2013 नंतर मुंबईचा संघ या स्पर्धेतील पहिला सामना जिंकू शकलेला नाही आणि या हंगामातही तेच घडले.
या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबईचा पहिला विजय असेल तर राजस्थान विजयी मालिका कायम राखण्याचा प्रयत्न करेल. डीवाय पाटील स्टेडियमवर होणार्या या सामन्याआधी जाणून घ्या याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना शनिवार, २ एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तर टॉस सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी दुपारी 3 वाजता होणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर पाहता येणार आहे.