rohit sharma
IPL 2022: Rohit has a big chance to beat Virat in the match against Delhi

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सामना होणार आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्माला विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे. यासह रोहित शर्मा एका मोठ्या विक्रमाच्या जवळ पोहोचला असून, आयपीएल इतिहासात असे करणारा तो चौथा फलंदाज ठरणार आहे.

रोहित शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक मोठे विक्रम आहेत, ज्यातील सर्वात मोठा विक्रम म्हणजे सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा कर्णधार होण्याचा विक्रम. रोहित शर्मा आणखी एका विक्रमाच्या जवळ आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये 213 सामने खेळले असून 208 डावात 5611 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सर्व मोसमात एकूण 491 चौकार मारले आहेत. म्हणजेच 9 चौकार मारताच तो लीगमधील 500 चौकार पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो पाचवा आयपीएल खेळाडू ठरणार आहे.

शिखर धवन – 654 चौकार*

विराट कोहली – 546 चौकार*

डेव्हिड वॉर्नर – ५२६ चौकार*

सुरेश रैना – 506 चौकार

विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी

रोहित शर्माला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चांगली फलंदाजी करून विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे. आज जर त्याने 46 धावा केल्या तर तो दिल्लीविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. मात्र, या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे, कारण आज जरी रोहितने हा विक्रम केला तरीही जेव्हा आरसीबी दिल्लीविरुद्ध खेळेल, तेव्हा विराटला रोहितला या यादीत मागे टाकण्याची संधी असेल.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स रविवारी एकमेकांविरुद्ध खेळून आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. कर्णधार म्हणून रोहित शर्मासमोर ऋषभ पंत असेल. पहिल्या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या 11 प्लेइंगसह उतरतात हे पाहावे लागेल.