DUPLESIS
IPL 2022: RCB takes big leap in points table; Find out where your favorite team is.

मुंबई : आयपीएल 2022 बद्दल बोलायचे तर 18 सामने झाले आहेत. यानंतर पॉइंट टेबलमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. टॉप-4 संघांबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येकाकडे 6-6 गुण आहेत. मात्र रनरेटमुळे ते क्रमवारीत मागे पडत आहेत. 10 पैकी 8 संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवून गुणांचे खाते उघडले आहे. केवळ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई यांना आतापर्यंत एकही विजय मिळालेला नाही आणि दोघांचे शून्य गुण आहेत. टी-20 लीगमध्ये आजही 2 सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना केकेआर आणि दिल्ली यांच्यात तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने चालू हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे.

आयपीएलच्या पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाले तर केकेआरचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. त्याने 4 पैकी 3 सामने जिंकले असून 6 गुण आहेत. संघाचा नेट रन रेट 1.102 आहे. गुजरातने आतापर्यंत 3 सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत. संघ 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रन रेट 0.349आहे. आरसीबी आणि लखनऊचेही 6-6 गुण आहेत. आरसीबीने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तात्यांचा नेट रन रेट 0.294आहे. संघ सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे. त्याचबरोबर लखनऊनेही 4 पैकी 3 सामने जिंकले असून ते चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट 0.256 आहे.

राजस्थान रॉयल्सने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांचे 4 गुण असून ते पाचव्या स्थानावर आहे. नेट रन रेट 1.218 आहे. पंजाब किंग्जने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. संघ 4 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. रनरेट 0.152 आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने 3 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. संघ 2 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. रनरेट -0.116 आहे. सनरायझर्स हैदराबादनेही 3 पैकी एक सामना जिंकला असून 2 गुणांसह 8व्या स्थानावर आहे. रनरेट -0.889 आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने खेळले असून त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. दोघांनाही शून्य गुण आहेत. मुंबईचा संघ -1.181 निव्वळ रनरेटसह 9व्या तर CSK -1.211 रनरेटसह 10व्या क्रमांकावर आहे. CSK चा संघ या स्पर्धेचा गतविजेता देखील आहे.