RCB
IPL 2022 : RCB मध्ये "या" नवीन खेळाडूचा समावेश; खेळले फक्त 4 सामने

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने जखमी लवनीथ सिसोदियाच्या जागी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या उर्वरित सामन्यांसाठी रजत पाटीदारचा संघात समावेश केला आहे. याची फ्रँचायझीने अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे.

मात्र लवनीथला कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे, याचा खुलासा फ्रेंचायजीकडून करण्यात आलेला नाही. बायो-बबलमध्ये तो संघासोबत राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटीदारने आतापर्यंत 31 टी-20 सामने खेळले असून 7 अर्धशतकांच्या मदतीने त्याच्या नावावर 861 धावा आहेत. चार वेळा आरसीबीकडून खेळणाऱ्या या फलंदाजाचा 20 लाख रुपये खर्चून संघात समावेश करण्यात आहे. फलंदाजीसोबत तो गोलंदाजीही माहीर आहे.

फॅफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने या मोसमात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, त्यात एक जिंकला आणि एक हरला. 5 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्यांची लढत राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.