RCB
IPL 2022: RCB finally opened the account of victory, KKR defeated by 3 wickets

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना बुधवारी डिवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या सहाव्या सामन्यात तीन गडी राखून जिंकला. आरसीबीला 129 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाने 19.2 षटकात 132 धावा करून पूर्ण केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघाने फलंदाज अनुज रावतच्या रूपाने पहिली विकेट गमावली, त्याला गोलंदाज उमेश यादवने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दोन चेंडूंत दोन विकेट गमावल्या. आधी टीम साऊथीने कर्णधार फाफ डू प्लेसिसला बाद केले आणि उमेश यादवने विराट कोहलीला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोहली अवघ्या 12 धावा करून परतला.

कोलकात्याकडून मिळालेल्या 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खूप खराब झाली आणि 17 धावांतच संघाने आपले तीन विकेट गमावल्या. सहा षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या तीन बाद 36 अशी होती.

10व्या षटकानंतर बंगळुरूची 3 विकेट गमावून 59 धावा झाल्या होत्या. यादरम्यान डेव्हिड विली 17 धावांवर तर शेरफेन रदरफोर्ड १४ धावांवर फलंदाजी करत होता. दोघांमध्ये 42 धावांची भागीदारी झाली.

बंगळुरूला 11व्या षटकात चौथा धक्का बसला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुनील नरेनने डेव्हिड विलीला नितीश राणाच्या हाती झेलबाद केले. विली 28 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला. त्याने शेरफेन रदरफोर्ड सोबत 53 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली. 11 षटकांनंतर बंगळुरूने 4 गडी गमावून 62 धावा केल्या होत्या. विली बाद झाल्यानंतर शाहबाज अहमद क्रीजवर होता.

14 षटकांनंतर शाहबाज अहमद 17 आणि शेरफेन रदरफोर्ड 25 धावांवर फलंदाजी करत होता. 15 व्या षटकात, संघाला आणखी एक धक्का बसला, जेव्हा वरुण चक्रवर्तीच्या षटकात शाहबाज अहमद मोठा शॉट घेण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याचा चेंडू चुकला आणि यष्टीरक्षक जॅक्सनने त्याला बाद केले. वरुण चक्रवर्तीची ही पहिली विकेट होती.

17 व्या षटकात पुन्हा एकदा सामना बदलला, जेव्हा शेरफेन रदरफोर्ड दुसऱ्या चेंडूवर साऊथीच्या हाती बाद झाला, तेव्हा शेरफेनने 40 चेंडूत 1 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याच वेळी, 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, साऊथीने हसरंगाची विकेट घेतली, यादरम्यान हसरंगा रसेलच्या हाती झेल बाद झाला. यानंतर हर्षल पटेल फलंदाजीला आला आणि आधीच फलंदाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा सामन्यात जीवदान दिले आणि दोन्ही फलंदाज 10 आणि 14 धावांवर नाबाद राहिले.

सामना रंगत असल्याचे पाहून दोन्ही फलंदाजांनी शानदार पद्धतीने संघाला विजय मिळवून दिला आणि आरसीबीने 19.2 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा केल्या आणि फलंदाज कार्तिकच्या चौकाराने सामना संपला.