मुंबई : अखेर चार सामन्यांनंतर नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने पहिल्या विजयाची चव चाखली. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK च्या फलंदाजाने शानदार फलंदाजी करत 216 धावांची मोठी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात RCB संघ निर्धारित षटकात 9 गडी बाद 193 धावाच करू शकला आणि चेन्नईने हा सामना 23 धावांनी जिंकला. या सामन्यात सीएसकेने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही सुधारणा केली. सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाने या सामन्यात 4 षटकात 39 धावांत 3 बळी घेतले.
या कामगिरीसह जडेजाने आरसीबीविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. त्याच्याकडे आता RCB विरुद्ध 26 विकेट्स आहेत आणि तो कोणत्याही एका फ्रँचायझीविरुद्ध सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. या यादीत जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहरासारख्या गोलंदाजांचीही नावे आहेत. बुमराहच्या खात्यात 24 तर नेहराच्या खात्यात 23 विकेट जमा आहेत.
आरसीबीविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. संघाचा पाया रचणाऱ्या शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली आणि 216 धावांची मोठी भागीदारी केली. उथप्पाने 50 चेंडूत 88 तर दुबेने 46 चेंडूत 95 धावा केल्या. दुबे आणि उथप्पा यांनी फलंदाजीची जबाबदारी घेतली, तर गोलंदाजीत महेश तिक्षाने 4 बळी घेत चेन्नईला पहिला विजय मिळवून दिला. चेन्नईचा पुढील सामना 17 एप्रिलला गुजरात टायटन्स या नव्या संघाशी होणार आहे.