मुंबई : कोलकाता आणि मुंबई यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर मुंबईला या मोसमात सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 4 गडी गमावून 161 धावा केल्या होत्या, जे पॅट कमिन्सने 15 चेंडूत खेळलेल्या 56 धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे कोलकाता संघाने 16 षटकात पूर्ण केले. सामन्यानंतर मुंबईसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा हे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत.
यावरून दोन्ही खेळाडूंना फटकारले आहे. नितीश राणाला मॅच फीच्या 10 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याने हा लेव्हल 1 गुन्हा मान्य केला आहे. जसप्रीत बुमराहनेही लेव्हल 1 चा हा गुन्हा मान्य केला आहे, त्यालाही फटकारले आहे. सामन्याच्या 12व्या षटकात नितीश राणा बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने बॅट सीमारेषेवरील बोर्डावर आदळली.
दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर मुंबईविरुद्धचा सामना नितीश राणासाठी चांगला नव्हता आणि त्याने केवळ 8 धावा केल्या, तर बुमराहसाठीही हा सामना काही खास नव्हता. या सामन्यात त्याने फक्त 3 षटके टाकली आणि 26 धावा दिल्या. या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. अशा चुका टाळण्याचा हा दोन्ही खेळाडूंसाठी धडा आहे कारण अशा चुका पुन्हा झाल्यास त्यांना दंडाच्या रूपात अधिक त्रास सहन करावा लागू शकतो.