मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मेगा लिलावानंतर पूर्णपणे बदललेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासमोर स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान असणार आहे. दिल्लीचा संघ तरुणांचा आहे आणि अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनच्या निवडीत मुंबईचा कर्णधार कोणतीही कसर सोडणार नाही.
रोहित आणि ईशान देणार सलामी
मुंबई संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची सलामीची जोडी अनुभवी असून त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. मेगा लिलावापूर्वी इशान किशनला सोडणाऱ्या मुंबईने 15 कोटींची मोठी रक्कम खर्च करून त्याला संघात परत आणले.
संघाचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त असल्याने येथे संघासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्याचा फिटनेस पाहता तो पहिल्या काही सामन्यांना मुकणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला संधी दिली जाऊ शकते. टीम डेव्हिड आणि किरॉन पोलार्ड मधल्या फळीत दिसू शकतात.
जसप्रीत बुमराह हा या संघाचा वेगवान गोलंदाजीतील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे, त्याला मेगा लिलावापूर्वी कायम ठेवण्यात आले होते. जयदेव उनाडकट संघाशी संबंधित आहे, त्याचा फायदा मुंबईला होणार आहे. डॅनियल सॅम्स आणि टायमल मिल्स गोलंदाजीत संघाला मजबूत करतील. मयंक मार्कंडे फिरकीची कमान सांभाळू शकतो तसेच पोलार्डकडून गोलंदाजीतही संघाला आशा असेल.
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्माला, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, संजय यादव, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स