मुंबई : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली आणि या संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु या सामन्यांमध्ये संघाचा युवा फलंदाज तिलक वर्माने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईकडून खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये या मधल्या फळीतील फलंदाजाने आकर्षक खेळी करून आपली प्रतिभा सिद्ध केली. मुंबईच्या संघाने या मोसमात तिलक वर्माला 1.7 कोटींना विकत घेतले, तर या खेळाडूने आपल्या संघाला निराश केले नाही. त्याने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये 22 आणि 61 धावा केल्या आहेत.
हैदराबादच्या 19 वर्षीय खेळाडूचा आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता आणि ज्युनियर स्तरावर त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला मुंबई संघाने विकत घेतले. तिलक वर्मा 2020 च्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या चांगल्या कामगिरीमुळेच त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
दरम्यान, हा खेळाडू आता आपल्या आर्थिक आव्हानांची आठवण करून देत भावूक झाला आहे. आर्थिक स्थितीत बाबत बोलताना खेळाडू म्हणाला, “आपल्या कुटुंबासाठी घर घेण्याचे ध्येय आहे.”
एका वृत्तसंस्थेशी बोलताना खेळाडू म्हणाला, “आम्हाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. माझ्या वडिलांनी खूप कठीण परिस्थितीत माझा क्रिकेट खर्च आणि माझ्या मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च केला. पुढे खेळाडू म्हणाला, आमच्याकडे अजून घर नाही. त्यामुळे या आयपीएलमध्ये मी जे काही कमावले आहे त्यातून माझ्या आई-वडिलांसाठी घर खरेदी करणे हेच माझे ध्येय असल्याचे खेळाडूने म्हंटले आहे.