मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 15 वा सामना गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. आयपीएलमध्ये लखनऊ संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 जिंकले आहेत आणि 1 गमावला आहे. त्याचवेळी, दिल्लीने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत ज्यात एकात विजय मिळवला आहे तर दुसऱ्यात पराभव पत्करावा लागला आहे. अशा स्थितीत 7 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवायचा आहे.
सामना क्रमांक 15
सामन्याची तारीख 7 एप्रिल
टॉस – संध्याकाळी 7:00
वेळ – सकाळी 7:30
स्थळ – डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी
डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली आहे, येथे वेगवान गोलंदाजांना उसळी मिळेल. 180 धावांचे लक्ष्य येथील संघांसाठी कठीण आहे. पण या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीला 200 पेक्षा जास्त धावसंख्याही राखता आली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात 129 धावांचे लक्ष्यही अवघड वाटत होते. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने सामना जिंकला. 194 धावांचे लक्ष्य राखताना राजस्थानने मुंबईला 170 धावांवर रोखले.
संभाव्य प्लेइंग 11
लखनऊ : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, मार्कस स्टॉइनिस, आवेश खान, रवी बिश्नोई.
दिल्ली : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, केएस भरत/मनदीप सिंग, ऋषभ पंत (सी/डब्ल्यू), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नोर्टजे, मुस्तफिजुर रहमान.