lkhnvu super jainets
IPL 2022: Lucknow Super Giants lose by three runs; Rajasthan's thrilling victory

मुंबई : काल संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली, राजस्थान रॉयल्सचा सामना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ लखनऊ सुपर जायंट्सशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने 20 षटकांत 6 बाद 165 धावा केल्या आणि लखनऊसमोर विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, लखनऊ 20 षटकांत 8 गडी गमावून 162 धावाच करू शकला.

लखनऊची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार केएल राहुल बाद झाला आणि दुसऱ्याच चेंडूवर कृष्णप्पा गौतम शून्यावर बाद झाला. राहुल आणि गौतम हे दोघेही गोल्डन डकीचे बळी ठरले. जेसन होल्डरला अश्विनने 8 धावांवर प्रसिद्ध कृष्णच्या हाती झेलबाद केले. दीपक हुडाने 25 धावा केल्या आणि त्याला कुलदीप सेनने बाद केले. चहलच्या चेंडूवर 5 धावा काढून आयुष बडोनी झेलबाद झाला. चहलने डिकॅकला 39 धावांवर परागच्या हाती झेलबाद केले. कृणाल पंड्याही 22 धावा करून चहलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला आणि या सामन्यात तो त्याचा तिसरा बळी ठरला. चहलने चमिरा लेग बिफोरला 13धावांवर बाद केले. लखनऊसाठी चहलने चांगली गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या.

लखनऊसाठी आवेश खानला पहिले यश मिळाले आणि त्याने सलामीवीर जोस बटलरला 13 धावांवर क्लीन बोल्ड केले. या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने 13 धावांची खेळी केली आणि तो जेसन होल्डरच्या चेंडूवर बाद झाला. या सामन्यात सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या देवदत्त पडिक्कलने 29 चेंडूत 29 धावा केल्या, मात्र कृष्णप्पा गौतमने त्याला होल्डरच्या हातून झेलबाद केले, तर व्हॅन डर ड्युसेनही 4 धावांवर गौतमच्या गोलंदाजीवर बाद झाला. अश्विन 28 धावा करून बाद झाला, तर रायन पराग 8 धावांवर बाद झाला. हेटमायरने 36 चेंडूत 6 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या तर बोल्ट 2 धावांवर नाबाद राहिला. लखनऊकडून होल्डर आणि गौतमने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

लखनऊ संघाने या सामन्यासाठी दोन बदल केले ज्यात अँड्र्यू टे आणि एव्हिन लुईस यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि त्यांच्या जागी मार्कस स्टाइनिस आणि दुष्मंथा चमिरा यांचा समावेश करण्यात आला. त्याच वेळी, राजस्थानने देखील दोन बदल केले ज्यात कुलदीप सेन आणि व्हॅन डर डुसेन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, तर नवदीप सैनी आणि यशस्वी जैस्वाल यांना संघातून वगळण्यात आले.