lkanvu
IPL 2022: Lucknow-Hyderabad clash today; Find out when and where to watch the match

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमातील 12 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स आमने-सामने असतील. हैदराबाद संघ आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता तर लखनऊने आतापर्यंत दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव स्वीकारला आहे. या सामन्यात हैदराबाद संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे, तर लखनऊ आपला वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

या मोसमात नवीव संघ लखनऊचे कर्णधारपद राहुलच्या हाती आहे. तर केन विल्यमसन हैदराबादचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना या फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. या सामन्यापूर्वी जाणून घेऊया कधी,कुठे होणार सामन्याची सुरुवात.

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना सोमवार, ४ एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आणि टॉस सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी संध्याकाळी 7 वाजता होईल.

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर पाहता येणार आहे.