मुंबई : IPL 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये रविवारी एक रोमांचक सामना अपेक्षित आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनऊ संघाने हंगामाची सुरुवात चांगली केली असून पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकून संघ तिसऱ्या स्थानावर आहे. लोकेश राहुलच्या संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्स या दुसऱ्या संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र त्यानंतर संघाने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघाचा पराभव केला आहे.
राहुलने आपल्या फलंदाजी आणि कर्णधारपदाने प्रभावित केले आहे, तर एविन लुईस, दीपक हुडा आणि आयुष बडोनी यांनी फलंदाजीसह उत्कृष्ट कामगिरी करून संघाला संतुलन आणि स्थिरता दिली आहे. गोलंदाजीचा विचार करता, वेगवान गोलंदाज आवेश खान आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई यांनी टी-20 क्रिकेटमधील काही प्रस्थापित नावांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे.
टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरच्या जोडीने लखनऊच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत झाली आहे. दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सलामीवीर क्विंटन डी कॉकनेही 52 चेंडूत 80 धावा केल्या होत्या. बडोनी आणि कृणाल पांड्या यांनीही सुरेख खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
असे असतानाही लखनऊचा रस्ता तितका सोपा होणार नाही कारण चौथ्या क्रमांकावर असलेला राजस्थान रॉयल्स संघ सध्याच्या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ म्हणून उदयास आला आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
बंगळुरूविरुद्धच्या पराभवापूर्वी संघाने सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सचा अनुक्रमे 61 आणि 23 धावांनी पराभव केला होता. शॉर्ट फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला जोस बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि शतक झळकावल्यानंतर त्याने आरसीबीविरुद्ध 47 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या.
बटलरशिवाय देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायर हेही वेगवान धावा करण्यात सक्षम आहेत. कर्णधार संजू सॅमसनकडेही गोलंदाजीचे कोणतेही आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने गेल्या काही सामन्यांमध्ये धावा दिल्या आहेत. फलंदाजीत योगदान देण्यात अपयशी ठरलेल्या रियान परागला सहाव्या क्रमांकावर कायम ठेवले जाते का, हेही पाहावे लागेल.
बटलर, हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट या तीन परदेशी खेळाडूंसह, रॉयल्सकडे जिमी नीशमसारखा अष्टपैलू खेळाडू खेळण्याचा पर्याय आहे जो प्लेइंग इलेव्हनला अधिक संतुलित करू शकतो.
संघ खालीलप्रमाणे
राजस्थान रॉयल्स :
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, प्रशांत कृष्णा, रियान पराग, देवदत्त पडिक्कल, नवदीप सैनी, करुण नायर, रसी व्हॅन डर डुसेन, जिमी नीशम, एन. डॅरिल मिशेल, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, ओबेद मॅकॉय, तेजस बारोका आणि केसी करिअप्पा.
लखनऊ सुपरजायंट्स :
लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, एविन लुईस, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, काइल मायर्स, आवेश खान, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, आयुष बडोनी, मनन वोहरा, कृष्णप्पा गौतम, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, मयंक यादव, मोहसीन खान आणि करण शर्मा.