मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामातील 8 वा सामना शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होईल. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरसमोर मयंक अग्रवाल असेल. हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर, KKR चं पारडं जड दिसत आहे.
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये केकेआरचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये कोलकाताने 19 आणि पंजाबने 10 जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये गौतम गंभीरने सर्वाधिक 492 धावा केल्या आहेत, तर सुनील नरेनने 31 बळी घेतले आहेत. दोन्ही संघांमधील गेल्या 5 सामन्यांमध्ये केकेआरने 3 तर पंजाबने 2 जिंकले आहेत.
सामना क्रमांक 8
तारीख – 1 एप्रिल
टॉस – संध्याकाळी 7:00
सामना सुरू – संध्याकाळी 7:30 वा
स्थळ- वानखेडे स्टेडियम
कोलकात्याची संभाव्य प्लेइंग 11
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन, मोहम्मद नबी, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग 11
मयंक अग्रवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, राज बावा, शाहरुख खान, ओडिन स्मिथ, अर्शदीप सिंग, हरप्रीत सिंग ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर