orange cap
IPL 2022: Jose Butler of Rajasthan completes 200 runs to capture the Orange Cap

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. सर्व संघांनी 2 किंवा अधिक सामने खेळले आहेत. त्यामुळे फलंदाजांमध्ये धावांची लढाई सुरू झाली आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. राजस्थानच्या जोस बटलरची बॅट धुमाकूळ घालत आहे, तर मुंबईचा इशान किशनही सतत त्याच्या मागे आहे. बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसही बॅटची ताकद दाखवत आहे.

सध्या राजस्थानचा बटलर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पुढे आहे. मंगळवारी त्याने बंगळुरूविरुद्ध नाबाद 70 धावा करत स्पर्धेतील 200 धावांचा टप्पा पार केला आहे. 3 सामन्यांनंतर त्याच्या खात्यात 205 धावा जमा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा किशन आहे ज्याने 3 सामन्यात 149 धावा केल्या आहेत. बेंगळुरूच्या कर्णधाराने राजस्थानविरुद्ध २९ धावा करून तिसरे स्थान पटकावले. 3 सामन्यांनंतर त्याने 122 धावा केल्या आहेत.

मुंबईचा फलंदाज तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर असून, तोही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने 38 धावा केल्या होत्या. आता त्याच्या 3 सामन्यात 121 धावा झाल्या आहेत. लखनऊचा फलंदाज दीपक हुडा पाचव्या क्रमांकावर असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने 3 सामन्यात 119 धावा केल्या आहेत. राजस्थानचा फलंदाज शिमरॉन हेटमायर सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 3 सामन्यात 109 धावा केल्या आहेत.

सातव्या क्रमांकावर शिवम दुबे आहे ज्याने 3 सामन्यात 109 धावा केल्या आहेत. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने 3 सामन्यात 108 धावा केल्या असून तो 8व्या क्रमांकावर आहे. आंद्रे रसेल आणि लियाम लिव्हिंगस्टन अनुक्रमे 9व्या आणि 10व्या स्थानावर आहेत. रसेलच्या 4 सामन्यात 106 धावा आहेत तर लिव्हिंगस्टनच्या 3 सामन्यात 98 धावा आहेत.

पंजाबचा फलंदाज लिव्हिंगस्टनने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 32 चेंडूत 60 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले.