नवी दिल्ली : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजपासून आयपीएल 2022 सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या हाती असेल. आयपीएल सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपद भूषवणार असून आज रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात तो आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद करेल. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जडेजा समावेश होणार आहे.
रवींद्र जडेजा आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स, कोची टस्कर्स केरळ आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे. रवींद्र जडेजाने आयपीएलचे एकूण 200 सामने खेळले आहेत. जडेजा 200 आयपीएल सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे, तर रॉबिन उथप्पा 193 सामन्यांसह दुसऱ्या, एबी डिव्हिलियर्स (184) तिसऱ्या आणि अंबाती रायडू (175) चौथ्या स्थानावर आहे. रवींद्र जडेजा हा चेन्नईचा तिसरा कर्णधार आहे, त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी संघाचे नेतृत्व केले आहे.