ipl
IPL 2022: IPL thriller starts from today; Know the rules, matches, time, everything

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (26 मार्च) आजपासून सुरु होत आहे. ग्रुप स्टेजमध्ये एकूण 70 सामने खेळले जातील, जे सर्व महाराष्ट्रातील चार स्टेडियममध्ये होतील. यावेळी 2 नवीन संघांसह आयपीएलच्या कार्यक्रमाचे स्वरूप थोडे वेगळे असेल. संघ 2 गटांमध्ये विभागले गेले आहेत. एक नजर दोन्ही गटांच्या संघांकडे टाकुया, तसेच सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊया. आणि स्पर्धेशी संबंधित संपूर्ण माहिती.

1- IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये 10 संघ खेळत आहेत

1.मुंबई इंडियन्स
2.चेन्नई सुपर किंग्ज
3.कोलकाता नाईट रायडर्स
4.पंजाब किंग्ज
5.दिल्ली कॅपिटल्स
6.सनरायझर्स हैदराबाद
7.राजस्थान रॉयल्स
8.रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
9.लखनौ सुपर जायंट्स
10.गुजरात टायटन्स

2- आयपीएल 2022 गट अ संघ गट अ

1- मुंबई इंडियन्स
2- कोलकाता नाईट रायडर्स
3- राजस्थान रॉयल्स
4- दिल्ली कॅपिटल्स
5- लखनौ सुपर जायंट्स

3- आयपीएल 2022 गट ब संघ गट ब

1- चेन्नई सुपर किंग्ज
2- सनरायझर्स हैदराबाद
3- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
4- पंजाब किंग्स
5- गुजरात टायटन्स

4- IPL 2022 स्थळ :

IPL 2022 चे सामने चार स्टेडियममध्ये होणार आहेत

मुंबई : वानखेडे स्टेडियम : एकूण 20 सामने खेळवले जातील.
मुंबई : ब्रेबॉर्न स्टेडियम (CCI) : एकूण 15 सामने खेळवले जातील.
मुंबई : डीवाय पाटील स्टेडियम : एकूण 20 सामने खेळवले जातील.
पुणे : एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम : एकूण 15 सामने खेळवले जातील.

5- आयपीएल 2022 थेट प्रक्षेपण चॅनेल

Star Sports 1
Star Sports 1HD
Star Sports 2
Star Sports 2HD
Star Sports Hindi
Star Sports Hindi 1HD
Star Sports Select 1
Star Sports Select 1HD
Star Sports Star Gold
Star Sports Gold HD

6- आयपीएल 2022 फॉरमॅट

सर्व 10 संघ दोन गटात ठेवण्यात आले आहेत. एका गटात पाच संघ आणि दुसऱ्या गटात पाच संघ आहेत. आधीपासून खेळत असलेल्या आठ संघांना मागील विजेतेपद आणि कामगिरीनुसार प्रथम क्रमांक देण्यात आला आणि नंतर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या संघांना स्वतंत्र गटात ठेवण्यात आले. उदाहरणार्थ, सर्वाधिक विजेतेपदे जिंकणाऱ्या संघांनुसार, मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे आणि चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दोघांनाही वेगवेगळ्या गटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आले.आता त्याच पद्धतीने तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला एका गटात आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला दुसऱ्या गटात ठेवण्यात आले. आता नवीन असलेल्या 2 संघांचा एका गटात समावेश करण्यात आला आहे.

सर्व संघ ग्रुप स्टेजमध्ये 14-14 सामने खेळतील. एक संघ त्याच्या गटातील इतर 4 संघांसह 2 – 2 सामने खेळेल, म्हणजे एकूण 8 सामने. तोच संघ त्याच्या स्थानावर असलेल्या दुसऱ्या गटातील संघासोबत 2 सामने खेळेल आणि उर्वरित संघासोबत 1 सामना खेळेल. मुंबई आणि चेन्नई आपापल्या गटात आघाडीवर असल्याने दोघेही एकमेकांविरुद्ध 2 सामने खेळतील. त्यानुसार, एक संघ आपल्या गटासह 8 सामने आणि उर्वरित 6 सामने इतर गटासह खेळेल.

आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक :