
मुंबई : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात शनिवारी (26 मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्या सामन्याने भारतातील क्रिकेटचा सण म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा हंगाम सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. गेल्या मोसमाच्या फायनलमध्ये चेन्नईने कोलकात्याला हरवून चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नई संघाने 17 आणि कोलकाता 8 जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णयीत राहिला. गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईने चार आणि कोलकाताने फक्त एकच विजय मिळवला आहे.
यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. कारण, एमएस धोनीने स्पर्धेपूर्वी चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर जडेजाला ही जबाबदारी मिळाली. संघाबद्दल बोलायचे तर अष्टपैलू मोईन अली पहिल्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध होणार नाही, कारण तो सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. मेगा लिलावात तब्बल 14 कोटींना विकला गेलेला दीपक चहर जखमी झाला आहे. त्याच्या जागी संघात काही नवीन चेहरे दिसू शकतात. ऋतुराज गायकवाडसह डेव्हॉन कॉनवे डावाची सुरुवात करताना दिसतील.
खेळाडूंची अनुपस्थिती ही कोलकाता नाईट रायडर्ससाठीही समस्या आहे. पॅट कमिन्स आणि अॅरॉन फिंच पहिल्या पाच सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध नाहीत. संघाची कमान नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या हाती आहे. अनेक जुने चेहरे संघासोबत असले तरी. दोन्ही संघांमध्ये एक मजेदार सामना अपेक्षित आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज :
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (क), एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, राजवर्धन हंगरकर, ख्रिस जॉर्डन, महेश थीक्षाना.
कोलकाता नाईट रायडर्स :
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (क), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, शिवम मावी, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.