मुंबई : इंडियन प्रीमियर लीग, क्रिकेट जगतातील सर्वात मोठी टी-20 लीग आजपासून (26 मार्च 2022) सुरू होत आहे. आज CSK आणि KKR यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. पुढील 2 महिन्यांहून अधिक काळ क्रिकेट चाहत्यांना एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळतील.
गेल्या चार वर्षांपासून आयपीएल उद्घाटन समारंभ आयोजित केले जात नाहीत. मात्र, यावेळी सलामीच्या सामन्याआधी टोकियो ऑलिम्पिकमधील देशाला अभिमान वाटणाऱ्या खेळाडूंचा बीसीसीआय सन्मान करणार आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्राला 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, ज्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती.
बीसीसीआयने गेल्या वर्षी ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसाठी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती, मात्र हा हा कार्यक्रम अजून व्हायचा होता. आता IPL 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी, BCCI त्या पदक विजेत्यांचा सन्मान करेल आणि त्यांना बक्षिसाची रक्कम सुपूर्द करेल.
बीसीसीआय नीरज चोप्राला सामन्यापूर्वी एक कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करेल आणि इतर खेळाडूंनाही घोषित बक्षीस रक्कम दिली जाईल. नीरज चोप्राने गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तो भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला खेळाडू आणि ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा इतिहासातील दुसरा भारतीय ठरला.
नीरज चोप्रा – 1 कोटी रुपये
रवी दहिया – 50 लाख रुपये
मीराबाई चानू – 50 लाख रुपये
बजरंग पुनिया – 25 लाख रुपये
लव्हलीना – 25 लाख
पीव्ही सिंधू – 25 लाख रुपये
हॉकी संघ – 1 कोटी 25 लाख रुपये
गेल्या मोसमातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता यांच्यात झाला होता, त्यामुळे या हंगामातील पहिला सामना दोन्ही संघांमध्ये खेळला जात आहे. कर्णधार म्हणून रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर आमनेसामने असतील.