HARDIK PANDYA
IPL 2022: Gujarat Titans take big decision before match; The 'yes' player will be the vice-captain

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) नवा संघ गुजरात टायटन्सने लीगचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सचा संघ सोमवारी आयपीएल 2022 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात लीगमधील दुसऱ्या नवीन संघ लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. या सामन्यापूर्वी संघाने अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. रशीदला गुजरातने 15 कोटी रुपयांना ड्राफ्टद्वारे खरेदी केले होते.

रशीद हा गुजरात टायटन्सच्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना आयपीएल लिलावापूर्वी फ्रँचायझीने सामील केले होते. रशीद खान लीगच्या आगामी सामन्यांमध्ये संघाचा उपकर्णधार असेल अशी घोषणा फ्रेंचायझीने रविवारी केली आहे. त्याचबरोबर संघाने कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे. लिलावापूर्वी संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंपैकी पंड्या देखील एक आहे.

आयपीएल मेगा लिलाव (IPL 2022 लिलाव) दरम्यान, गुजरातने अभिनव मनोहर सदारंगानी यांनाही विकत घेतले. मनोहरला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किमतीपेक्षा 13 पटीने जास्त किंमत देऊन विकत घेतले. अभिनवने त्याची मूळ किंमत फक्त 20 लाख रुपये ठेवली होती, परंतु नवीन IPL संघ गुजरात टायटन्सने त्याला 2.60 कोटी रुपयांमध्ये सामील करून घेतले. गुजरातने लॉकी फर्ग्युसनला 10 कोटींमध्ये विकत घेतले, राहुल तेवतियाला 9 कोटींना, मोहम्मद शमीला 6.25 कोटींना, आर साई किशोरला 3 कोटींना, जेसन रॉयला 2 कोटींना, अभिनव मनोहर सदरांगनीला 2.60 कोटींना आणि नूर अहमदला 30 लाखांना विकत घेतले.