मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 24 व्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा सामना राजस्थानशी होणार आहे. एकीकडे गुजरात संघाला तीन वेळा विजय मिळाल्यानंतर हैदराबादने पराभूत केले होते, तर राजस्थानचा संघ लखनऊला हरवून येथे पोहोचला आहे. राजस्थान संघाची फलंदाजी अतिशय संतुलित दिसते आहे. सलामीला जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल सारखे फलंदाज आहेत, तर मधल्या फळीत संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायरसारखे फलंदाज आहेत जे फिनिशरची भूमिका उत्तम बजावत आहेत.
दुसरीकडे, गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिल शानदार फॉर्मात आहे. त्याने बॅक टू बॅक अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, राहुल तेवतियाच्या रूपाने संघाकडे अतुलनीय फिनिशर उपलब्ध आहे. त्याने गुजरातला दोन सामन्यांत रोमांचक विजय मिळवून दिले आहेत.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना गुरुवार, 14 एप्रिल रोजी होणार आहे. यांच्यातील हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.