raina
IPL 2022: Fans warn franchise after third consecutive defeat; Said, "Think of Raina's name."

मुंबई : आयपीएल 2022 चा आतापर्यंतचा प्रवास चेन्नई सुपर किंग्जसाठी खास राहिलेला नाही. सीएसकेने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने गमावले आहेत. पंजाब किंग्जकडून मिळालेल्या सलग तिसऱ्या पराभवानंतर चाहते सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाला परत बोलवण्याची मागणी करत आहेत.

सीएसकेच्या खराब कामगिरीनंतर रवींद्र जडेजाच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत, ज्याला टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीने संघाची कमान दिली होती. सीएसकेच्या खराब कामगिरीनंतर पुन्हा एकदा रैनाची संघात पुनरागमनाची मागणी जोर धरू लागली आहे.

 रैना सोाल मीडिया पर जमकर ट्रेंड हो रहे हैं. फैंस का तो यहां तक कहना है कि सीएसके को रैना को उनकी बल्‍लेबाजी के लिए नहीं बल्कि लकी चार्म के लिए बेस प्राइस में खरीद लेना चाहिए.

IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, CSK ने सुरेश रैनाला सोडले होते आणि लिलावात देखील CSK सह कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यामध्ये रस दाखवला नाही यासह तो लिलावात अनसोल्ड राहिला.

सीएसकेच्या याच खराब कामगिरीनंतर रैना सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. चाहत्यांनी असे देखील म्हटले आहे की CSK ने रैनाला त्याच्या फलंदाजीसाठी नव्हे तर त्याच्या गुडलकसाठी त्याचा संघात समावेश करावा. सीएसकेच्या तिसऱ्या पराभवानंतर रैनाच्या नावावर पुनर्विचार करण्याचा इशाराही चाहत्यांनी दिला आहे.