मुंबई : IPL च्या 15 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात CSK संघ KKR विरुद्ध 6 विकेटने हरला, पण या सामन्यात दोन गोष्टी खूप खास होत्या. KKR विरुद्ध, CSK च्या दोन सर्वात अनुभवी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये एमएस धोनीने पहिल्या डावात नाबाद अर्धशतक झळकावले, तर दुसऱ्या डावात ब्रावोची उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. 38 वर्षीय ब्राव्होने केकेआरविरुद्ध चांगली गोलंदाजी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो यशस्वी होऊ शकला नाही.
ब्राव्होने KKR विरुद्ध त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 20 धावा दिल्या आणि तीन फलंदाजांना बाद केले. ब्राव्होने व्यंकटेश अय्यर, नितीश राणा आणि सॅम बिलिंग्ज याची विकेट घेतली. या तीन विकेट्सच्या जोरावर ब्राव्होने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत लसिथ मलिंगाच्या बरोबरीने आला आहे. लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये 122 सामन्यात 170 विकेट घेतल्या आणि आता ब्राव्होने 152 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत. ब्राव्होने आणखी एक विकेट घेताच तो या लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनेल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत, अमित मिश्रा 166 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे, जो या हंगामात खेळत नाही, तर पियुष चावला 157 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. पियुष चावला देखील या हंगामात कोणत्याही संघाचा भाग नाही. त्याच वेळी, 150 विकेट्ससह, आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंग पाचव्या क्रमांकावर आहे, जो आता आयपीएल खेळत नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज :
170 – ड्वेन ब्राव्हो
170 – लसिथ मलिंगा
166 – अमित मिश्रा
157 – पियुष चावला
150 – हरभजन सिंग