jadeja
IPL 2022: Dhoni's successor Ravindra Jadeja will now captain Team India!

मुंबई : रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये नव्याने पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल 2022 पूर्वी त्याला चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार बनवण्यात आले आहे. संघाला 4 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या एमएस धोनीने कर्णधारपद सोडले आहे. 26 मार्चपासून टी-20 लीगचा नवा हंगाम सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात, गतविजेत्या CSK चा सामना KKR सोबत होईल.

आता जडेजाला CSK चे कर्णधारपद सोपवल्याने सगळ्यांना त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत. राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्ननेही त्याच्यातील प्रतिभा लक्षात घेऊन त्याला रॉकस्टार ही पदवी दिली. वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने टी-20 लीगच्या पहिल्या सत्राचे विजेतेपदही पटकावले.

दरम्यान, जडेजाकडे CSK चे कर्णधारपद सोपवल्यानंतर बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह म्हणाले, “रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती झाल्याने त्याला भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन ओळख मिळेल. मला आशा आहे की एक दिवस तो टीम इंडियाचे कर्णधारपद देखील सांभाळेल.

रवींद्र जडेजाने नेहमीच आपल्या कामगिरीने आपली छाप सोडली आहे. 2013 मधील रणजी ट्रॉफीमधील त्याची कामगिरी पाहून एमएस धोनीने त्याला सर जडेजा असेही म्हटले होते. तेव्हापासून त्याला या नावाने ओळखले जाते. मात्र, जडेजासाठी टीम इंडियात स्थान मिळवणे सोपे नव्हते.

परदेशी खेळपट्ट्यांवर त्याच्या कामगिरीवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण 2018 मध्ये ओव्हल कसोटीत पहिल्या डावात त्याने 86 धावांची शानदार खेळी करून स्वतःला सिद्ध केले. यानंतर अनेक प्रसंगी त्याला आर अश्विनपेक्षा पसंती मिळू लागली. रवींद्र जडेजा नेहमीच नवनवीन गोष्टींसाठी ओळखला जातो.