ms dhoni virat kohli photo
ms dhoni virat kohli photo

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मंगळवारी सुपरहिट सामना होत आहे. चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आमनेसामने येणार आहेत. एका बाजूला महेंद्रसिंग धोनी तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली आहे. या खास सामन्यात अनेक विक्रमही केले जाऊ शकतात, खास बाब म्हणजे एमएस धोनी आणि विराट या दोघांनाही विक्रम करण्याची संधी आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा 200 वा सामना –

चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने या मोसमात आतापर्यंत एकही सामना जिंकला नसला तरी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून त्यांची गणना केली जाते. मंगळवारी चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल,

तेव्हा हा त्यांचा 200 वा आयपीएल सामना असेल. अशी कामगिरी करणारा चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील सहावा संघ ठरणार आहे. तेही चेन्नईवर दोन वर्षांची बंदी असताना.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले संघ –

• मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) – 221 सामने
• रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 215 सामने
• कोलकाता नाइट रायडर्स – 214 सामने
• दिल्ली कॅपिटल्स – 214 सामने
• पंजाब किंग्ज – 208 सामने
• चेन्नई सुपर किंग्ज – 200 सामने

धोनी 200 षटकार पूर्ण करेल –

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले असेल, पण त्याला अजूनही षटकार मारण्यात ब्रेक नाही. एमएस धोनीकडे चेन्नई सुपर किंग्जसाठी 200 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे.

धोनीला यासाठी 8 षटकारांची गरज आहे, जर त्याने असे केले तर तो सीएसकेसाठी 200 षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरेल. एमएस धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये 222 षटकार असले तरी त्यातील काही पुणे सुपरजायंट्ससाठीही आहेत.

CSK साठी सर्वाधिक षटकार –
• एमएस धोनी – 192 षटकार
• सुरेश रैना – 180 षटकार
• फाफ डु प्लेसिस – 87 षटकार

विराट कोहलीलाही मोठी संधी –

किंग विराट कोहली (Virat Kohli) ची बॅट आतापर्यंत शांत होती, पण त्याला मोठी संधी आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीला 52 धावांची गरज आहे. विराट कोहलीने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 28 सामने खेळले असून त्यात त्याने 41 च्या सरासरीने 948 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध 1000 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हा विक्रम केला आहे.