मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत एकूण तीन सामने झाले आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेला, तर रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध पंजाब किंग्जचा सामना झाला. पहिल्या तीन सामन्यांनंतर KKR, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जने पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले आहे.
सीएसके, मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. नेट रन रेटच्या बाबतीत पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स अव्वल आहे, तर मुंबई इंडियन्स तळाशी आहे.
यावेळी सर्व संघ आयपीएलमध्ये 14-14 सामने खेळणार आहेत. सर्व सामने मुंबई आणि पुणे येथे होणार आहेत. प्लेऑफचे सामने कुठे खेळवले जातील, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यावेळी एकूण 70 सामने खेळवले जाणार आहेत.