rishbh pant
IPL 2022: Dangerous bowler returns to Delhi Capitals

नवी दिल्ली : IPL 2022, 26 मार्चपासून सुरू होत आहे. आता याआधी दिल्ली कॅपिटल्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. स्टार गोलंदाज संघात परतला आहे. त्यामुळे आता ऋषभ पंतचे टेंशन कमी झाले आहे. या गोलंदाजामुळे संघाची गोलंदाजीक्रम मजबूत झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना 27 मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज एनरिच नोर्किया दिल्लीत परतला आहे. तो लवकरच संघात सामील होणार आहे. नोर्किया पत्नीसह मुंबईत पोहोचला आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत याची माहिती दिली आहे.

एनरिच नोर्किया बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आयपीएल 2022 मध्ये खेळू शकणार नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता तो संघात परतल्याने रिषभ पंतने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. या खतरनाक गोलंदाजाच्या पुनरागमनाने दिल्लीचे चाहतेही खूश आहेत.

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली दिल्ली संघाने गेल्या मोसमात प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. दिल्लीच्या संघाने आयपीएल मेगा लिलावात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा आपल्या संघात समावेश केला आहे.