मुंबई : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) निराशाजनक पराभव झाला. या पराभवानंतर रोहित शर्माकडून प्रतिक्रिया आली आहे. रोहित शर्माच्या मते संघ योजनेनुसार गोलंदाजी करू शकला नाही.
सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “मला वाटते ही चांगली धावसंख्या आहे. या खेळपट्टीवर सुरुवातीला 170 धावा करता येतील असे वाटले नव्हते, पण आम्ही मध्यभागी खेळलो आणि चांगली धावसंख्या उभारू शकलो. आम्ही आमच्या योजनेनुसार गोलंदाजी केली नाही.
पहिल्या गेममध्ये जिंकण्याच्या इच्छेबाबत रोहित शर्मा म्हणाला की, पहिला सामना असो किंवा शेवटचा सामना असो, आम्ही नेहमी तयार असतो. आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे. गोष्टी योजनेनुसार घडत नव्हत्या पण ते होऊ शकते. तुम्हाला फक्त एक गट म्हणून शिकण्याची गरज आहे. पराभवाने मी निराश झालो आहे पण सर्व काही संपलेले नाही.”
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारली. मुंबईने 5 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करताना नाबाद 81 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना दिल्लीने 6 बाद 179 धावा केल्या आणि सामना जिंकला. दिल्लीसाठी हा सामना खडतर होता पण ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी सोपा केला.
अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी सातव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. इथून मुंबईसाठी सगळं संपलं. अक्षर पटेलने 17 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. दुसरीकडे ललित यादवने नाबाद 48 धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.