मुंबई : आयपीएल 2022 च्या 15 व्या मोसमातील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्च रोजी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. पहिल्या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्रावो एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. तो महान श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू लसिथ मलिंगाला मागे टाकून नंबर एक वर येऊ शकतो.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. त्याने 122 सामन्यात 7.14 च्या इकॉनॉमीने 170 विकेट घेतल्या आहेत. 13 धावांत 5 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर त्याने 4 वेळा 6 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.
ब्राव्होने आयपीएलच्या 151 सामन्यात 167 विकेट घेतल्या आहेत. जर पहिल्या सामन्यात ब्रावोने चार विकेट घेतल्यास तो मलिंगाचा हा विक्रम मोडेल आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल.
ब्राव्होने आयपीएलमध्ये 8.35 च्या इकॉनॉमीने धावा केल्या आहेत. 22 धावांत 4 बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. लीगमध्ये त्याने दोनदा 4 विकेट्स घेतल्या आहेत.
लसिथ मलिंगा : 170 विकेट्स
ड्वेन ब्राव्हो : 167 विकेट्स
अमित मिश्रा : 166 विकेट्स
पियुष चावला : 157 विकेट्स
हरभजन सिंग : 150 विकेट्स
रविचंद्रन अश्विन : 145 विकेट्स
सुनील नरेन : 143 विकेट्स
भुवनेश्वर कुमार : 142 विकेट्स
युझवेंद्र चहल : 139 विकेट्स
जसप्रीत बुमराह : 130 विकेट्स