DELHI CAPITALS
IPL 2022: Big action against Rishabh Pant after defeat against Lucknow

मुंबई : आयपीएल 2022 च्या 15 व्या सामन्यात गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) ला लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे. सामना गमावल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याला दंडही ठोठावला आहे. पंतच्या संघाला वेळेवर ओव्हर पूर्ण करता आले नाही. त्यामुळे कर्णधार असल्याने त्याला 12लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

स्लो ओव्हर रेटमुळे दंड आकारण्याची ही तिसरी घटना आहे. या मोसमात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली. ज्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध निर्धारित वेळेत षटक गमावले. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेळेत ओव्हर टाकू शकला नाही आणि कर्णधार केन विल्यमसनलाही दंड ठोठावण्यात आला.

आयपीएल साइटवर सामन्यानंतरच्या प्रकाशनात म्हटले आहे, “टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 7 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला स्लो ओव्हर-रेट राखल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे.

किमान ओव्हर रेटशी संबंधित चालू हंगामातील ही पहिली चूक आहे. त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉच्या झटपट अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात, क्विंटन डी कॉकच्या 80 धावांच्या खेळीच्या जोरावर लखनऊने दोन चेंडू बाकी असताना चार गडी गमावून 155 धावा करून सामना जिंकला.