rohit

मुंबई : आयपीएल 2022 हा मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक राहिला आहे. 15 व्या मोसमात 5 सामने खेळलेला MI अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. बुधवारच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून संघाला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला असून मुंबईचा या मोसमातील हा सलग पाचवा पराभव आहे. मुंबईच्या अडचणी इथेच संपल्या नाही, तर पंजाबविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे संघाला दंडही ठोठावण्यात आला. या मोसमात मुंबईची ही दुसरी चूक असल्याने कर्णधारासह इतर खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा ही चूक केली तर दंडासोबतच कर्णधार रोहित शर्मावरही एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.

स्लो ओव्हर रेटच्या नियमांनुसार, जर एखाद्या संघाने हंगामात पहिल्यांदा ही चूक केली तर कर्णधाराला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. त्याच वेळी, दुसऱ्यांदा कर्णधारासह प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना दंड भरावा लागतो. कर्णधाराने चुकांची पुनरावृत्ती केल्यास, कर्णधारावरील दंडाची रक्कम 25 लाख होईल, तर उर्वरित खेळाडूंना 6 लाख दंड किंवा मॅच फीच्या 25 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती भरावी लागेल.

जर एखाद्या संघाने हंगामात तिसऱ्यांदा ही चूक केली तर कर्णधाराला एका सामन्याच्या बंदीसह 30 लाख रुपयांचा दंड आणि प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के दंड आकारला जाईल.

रोहित शर्माला आता चूक करण्याची संधी नाही. मुंबई इंडियन्सला या मोसमात अजून 9 सामने खेळायचे आहेत, जर तो एकदाही स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला तर कर्णधार रोहित शर्मावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.

पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव झाला स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर 199 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्यासमोर संघाला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 183 धावाच करता आल्या. मुंबईचा पुढचा सामना 16 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे.