ajinkya rahane
IPL 2022: Ajinkya Rahane breaks Rohit Sharma's big record; Completed 4000 runs in IPL

मुंबई : अजिंक्य रहाणे आयपीएल 2022 मध्ये केकेआरचे प्रतिनिधित्व करत आहे आणि या संघासाठी सलामीची फलंदाजी करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. या लीगच्या 8व्या सामन्यात रहाणेने वेंकटेश अय्यरसोबत पंजाब किंग्जविरुद्ध डावाची सुरुवात केली, यावेळी त्याने 11 चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकारांच्या मदतीने 12 धावा काढून बाद झाला. रहाणेने कागिसो रबाडाच्या चेंडूवर ओडियन स्मिथच्या हाती झेल बाद झाला. या खेळीच्या जोरावर रहाणेने आयपीएलमधील 4000 धावाही पूर्ण केल्या.

अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध 12 धावांच्या खेळीत 4000 धावा पूर्ण केल्या आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला. IPL मध्ये सर्वात जलद 4000 धावा करण्याच्या बाबतीत रहाणे आठव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी रोहित शर्मा या क्रमांकावर होता, तो आता नवव्या क्रमांकावर घसरला आहे. रहाणेने आयपीएलच्या 144 डावांमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या, तर रोहित शर्माने 147 डावांमध्ये इतक्या धावा केल्या. आयपीएलमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारा फलंदाज ख्रिस गेल आहे, ज्याने 112 डावांमध्ये हा पराक्रम केला.

IPL मध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारे 11 फलंदाज

112 – ख्रिस गेल

114 – डेव्हिड वॉर्नर

128 – विराट कोहली

131 – एबी डिव्हिलियर्स

140 – सुरेश रैना

140 – गौतम गंभीर

141 – शिखर धवन

144 – अजिंक्य रहाणे

147 – रोहित शर्मा

153 – रॉबिन उथप्पा

157 – एमएस धोनी

अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये भारतीय फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या लीगमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 154 सामन्यांच्या 144 डावांमध्ये त्याने एकूण 4006 धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याची या लीगमधील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 105 आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 9 फलंदाज

6336 – विराट कोहली

5843 – शिखर धवन

5652 – रोहित शर्मा

5528 – सुरेश रैना

4812 – एमएस धोनी

4800 – रॉबिन उथप्पा

4217 – गौतम गंभीर

4092 – दिनेश कार्तिक

4006 – अजिंक्य रहाणे