ARCHER
IPL 2022: After Mumbai's 5th defeat, the coach remembered Joffra Archer, said ...

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील मुंबई इंडियन्स संघाचे विजयाचे खाते अद्याप उघडलेले नाही. संघाला आतापर्यंत सलग 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई कधी फलंदाजीत मागे पडतो तर कधी गोलंदाजांना विरोधी संघावर दबाव आणता येत नाही. संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनीही हे मान्य केले आहे. एवढेच नाही तर संपूर्ण मोसमातून बाहेर असलेल्या जोफ्रा आर्चरचे नावही त्यांनी यावेळी घेतले.

जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात तब्बल 8 कोटी रुपयांना विकत घेतले पण तो या मोसमात खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे तो बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होता. दुखापतीमुळे तो भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो IPL-2021 चा देखील भाग होऊ शकला नाही.

यानंतर आता 44 वर्षीय प्रशिक्षक महेला जयवर्ध यांना पंजाब किंग्जविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर आर्चरची आठवण झाली आहे. आर्चरच्या अभावामुळे संघाला त्रास होत असल्याचे देखील त्यांनी काबुल केले. जयवर्ध म्हणाला की, “मुंबईचे गोलंदाज विरोधी संघाच्या फलंदाजांवर दबाव टिकवून ठेवण्यास असमर्थ आहे. बुधवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली पण पंजाबच्या फलंदाजांनी 20 षटकात 198 धावा केल्या. यानंतर मुंबई संघाला 9 विकेट्सवर 186 धावा करता आल्या आणि सामना 12 धावांनी गमवावा लागला.

पराभवानंतर जयवर्धने म्हणाले, “निश्चितपणे, आम्ही लिलावात आमच्यासाठी खरेदी केलेला सर्वोत्तम गोलंदाज जोफ्रा आर्चर येथे नाही. त्यामुळे नक्कीच संघाला अडचणी होत आहेत.