
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 23व्या सामन्यात मुंबईचा संघ जेव्हा खेळेल तेव्हा त्यांच्यासमोर विजय हा एकमेव पर्याय असेल कारण या संघाने सलग चार सामने आधीच गमावले आहेत. 2015 च्या मोसमातील पहिले चार सामने गमावूनही हा संघ चॅम्पियनच्या जेतेपदापर्यंत पोहोचला होता, तो इतिहास लक्षात घेऊन संघाला पंजाबसमोर येथे चांगले पुनरागमन करता येईल, अशी आशा आहे. मागील सामन्यात पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भर घालूनही, संघाने एका मागून एक विकेट गमावल्या, ज्याचा फटका संघाला पराभवाच्या रूपात सहन करावा लागला. सामन्यानंतर रोहित शर्मानेही आपण चुकीच्या वेळी आऊट झाल्याचे मान्य केले.
मुंबईची सलामीची जोडी, रोहित शर्मा आणि इशान किशन आजपर्यंत दोघेही ज्याप्रकारच्या खेळासाठी ओळखले जातात ते पाहायला मिळाले नाही. दोघेही या मोसमात फ्लॉप होताना दिसत आहेत. सामन्यात कर्णधाराला जबाबदारी घ्यावी लागणार असून संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे.
मधल्या फळीत सूर्यकुमारच्या आगमनाने संघाची चिंता कमी झाली आहे. पण त्याला बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. किरॉन पोलार्डच्या बॅटनेही अजून जास्त धावा काढल्या नाहीत. डेवाल्ड ब्रेव्हिस सारख्या तरुणावर संघाने विश्वास दाखवला आहे परंतु आतापर्यंत तो या विश्वासावर टिकू शकला नाही.
यावेळी फलंदाजीसोबतच मुंबईच्या गोलंदाजीतही कमी जाणवत आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह फ्लॉप ठरत आहे. तीन सामन्यांत त्याला एकही विकेट घेता आलेली नाही. टायमल मिल्सने चांगली गोलंदाजी केली पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. मुंबईला हा सामना जिंकायचा असेल तर अश्विनलाही विकेट घ्यावी लागणार आहे.
मुंबईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (क), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, फॅबियन अॅलन, अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी