
मुंबई : आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने एक मोठा निर्णय घेतला. धोनीने कर्णधारपद सोडले आणि आता तो या मोसमात रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. CSK चे नेतृत्व करणारा धोनी आणि सुरेश रैना नंतर तिसरा क्रिकेटर बनल्याने जडेजा एका नव्या युगाची सुरुवात करेल. धोनीच्या अनुपस्थितीत सीएसकेचे नेतृत्व करणारा सुरेश रैना हा एकमेव खेळाडू आहे.
दरम्यान, विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी रवींद्र जडेजाच्या कॅप्टन्सीवर आपले मत व्यक्त केले आहे. खेलनीती पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओत राजकुमार शर्मा म्हणाले, “जडेजा हा जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे यात शंका नाही. पण, त्याने फारसे कर्णधारपद भूषवलेले नाही आणि त्याला तेवढा अनुभवही नाही. एक चांगला क्रिकेटपटू हा चांगला कर्णधार असतोच असे नाही आणि काहीवेळा उलट सत्य असते.
राजकुमार शर्मा पुढे म्हणाले, “जडेजा बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे, त्याला संघाचे व्यवस्थापन कसे करायचे याची कल्पना असेल. माजी कर्णधार एमएस धोनी देखील त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करेल.
रवींद्र जडेजाने यापूर्वी कधीही रणजी संघाचे किंवा आयपीएल संघाचे नेतृत्व केलेले नाही. 28 ऑक्टोबर 2007 रोजी त्याने शेवटच्या वेळी संघाचे नेतृत्व केले होते, जेव्हा त्याने राजकोटच्या पश्चिम रेल्वे मैदानावर विनू मांकड U19 स्पर्धेत मुंबई U19 विरुद्ध सौराष्ट्र U19 चे नेतृत्व केले होते.
IPL 2012 मध्ये CSK ने जडेजाला त्यांच्या संघात समाविष्ट केले होते. सौराष्ट्राच्या अष्टपैलू खेळाडूने 2008 मध्ये राजस्थान रॉयल्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. जिथे त्याने आपल्या संघाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील रॉयल्सने अंतिम फेरीत एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेचा पराभव केला होता.
नंतर आयपीएल 2011 च्या लिलावात, जडेजाला तत्कालीन नवीन आयपीएल संघ कोची टस्कर्स केरळ (आता बंद) ने विकत घेतले होते. तथापि, करारातील अनियमिततेमुळे तो त्या हंगामात आयपीएल खेळू शकला नाही.