हिवाळा सुरु होतोय, फिरायला निघताय; मग देशातील ‘या’ प्रसिद्ध हिल स्टेशनला नक्की भेट द्या, परिवारासमवेत ट्रिप इंजॉय करा
Indias Famous Hill Station : सध्या संपूर्ण देशभरात ऑक्टोबर हिट मुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकच्या तापमानामुळे सर्वचजण बेजार झाले आहेत. शिवाय पहाटेच्या वेळी थोडीशी थंडीची देखील चाहूल लागत आहे. यामुळे आगामी काही दिवसात तीव्र थंडी जाणवणार आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही हिवाळा सुरू होतानाच कुठे फिरायचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आम्ही तुमच्यासाठी देशातील एका प्रसिद्ध हिल स्टेशन बाबत माहिती घेऊन हजर झालो आहोत. आम्ही ज्या पर्यटन स्थळाविषयी बोलतोय ते आहे राजस्थान मधील माउंट अबू.
खरंतर राजस्थान मध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. राजस्थानमध्ये लहान-मोठी शेकडो हिल स्टेशन आहेत. यामध्ये माउंट अबू हे सर्वाधिक लोकप्रिय आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असे हिल स्टेशन आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. जर तुम्हीही कुठे फिरायचा प्लॅन बनवत असाल तर माउंट अबू तुमच्यासाठी एक फायदेशीर पर्याय ठरणार आहे.
माउंट अबू ठरणार एक बेस्ट ऑप्शन
जर तुम्ही राजस्थान फिरायला जात असाल तर माउंट आबूला नक्की भेट द्या. हे राजस्थान मधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आणि खूपच लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे हिल स्टेशन अरावली टेकड्यांमध्ये स्थित आहे. या ठिकाणी मनाला भोवणारे दृश्य पाहायला मिळते. या ठिकाणी अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे देखील आहेत.
यामुळे परिवारासमवेत आणि मित्रांसमवेत या ठिकाणी भेट देणे तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कॉलिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. येथे तुम्हाला सुंदर निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय तुम्ही येथे अनेक एडवेंचर्स ऍक्टिव्हिटीज देखील करू शकणार आहात.
जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकीन असाल तर इथे तुम्हाला ट्रेकिंग देखील करता येणार आहे. या ठिकाणी तब्बल 18 प्रमुख ट्रेक पॉइंट आहेत. ज्यावर तुम्ही ट्रेकिंग करू शकणार आहात. याशिवाय तुम्ही येथे जंगल सफारी सारखा अनुभव देखील घेऊ शकणार आहात. येथील जीप सफारी खूपच लोकप्रिय आहे.
हे ठिकाण रॉक क्लाइंबिंग साठी देखील विशेष लोकप्रिय बनले आहे. या ठिकाणी जंगल, पर्वत, टेकड्या, डोंगर, दऱ्या पाहायला मिळतात सोबतच या ठिकाणी सूर्यास्त आणि सूर्योदयाचा देखील अद्भुत असा नजारा पाहायला मिळतो. या ठिकाणी तुम्ही सप्टेंबर ते मार्च या कालावधीमध्ये ट्रीप प्लॅन करायला हवी.
याचाच अर्थ सध्याचा कालावधी हा या ठिकाणाला एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कालावधी आहे. यामुळे जर तुम्ही येत्या एक-दोन महिन्यात कुठे फिरण्यासाठी निघणार असाल या पर्यटन स्थळाबाबत तुम्ही विचार करायला हवाच.